विशाल मिसळेची रिपाई माथाडी कामगार संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड.
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देण्याचा निर्धार.

बीड (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणीत माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी विशाल आप्पा मिसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपाई युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणीत माथाडी व जनरल कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष सचिन कासारे, सरचिटणीस अमित तांबे, कार्याध्यक्ष विजय कासारे, उपाध्यक्ष सागर लोखंडे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
नियुक्तीपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी व राष्ट्रीय नेते डॉ. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहून गोरगरीब माथाडी व जनरल कामगारांच्या हक्कांसाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
विशाल मिसळे यांनी नियुक्तीनंतर माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रभावी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, माथाडी कामगारांची नोंदणी, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, निवृत्तीवेतन, मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध योजना, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण, नियमित रोजगार, योग्य वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील माथाडी व जनरल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रिपाई युवा प्रदेशअध्यक्ष पप्पू कागदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राजू भाऊ जोगदंड , मायाताई मिसळे ,अविनाश भाऊ जोगदंड , अप्पा मिसळे ,शनी जोगदंड, दीपक वाघमारे, अजय डाके सह मित्र परिवार व पदाधिकारी उपस्थित होते.





