ब्रेकिंग न्यूज

बेपत्ता तरुणाचा मृतदेह बिंदूसरा तलावात सापडला..

अग्निशामक दल कर्मचाऱ्यांनी मृतदेह काढला बाहेर .

बीड (प्रतिनिधी)बीड शहरालगत पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात शुक्रवारी दुपारी ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सकाळी प्रकल्पाच्या काठावर मोटारसायकल व चप्पल आढळून आल्याने नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सकाळपासून तलावात शोधमोहीम सुरू होती. अखेर दुपारी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मृताची ओळख हमीद बागवान (वय ४०, रा. मोमीनपुरा, बीड) अशी पटली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कर्करोगाच्या आजारामुळे नैराश्यातून त्यांनी तलावात उडी घेऊन जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

तलावातील पाण्याची खोली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीमेत अनेक अडचणी आल्या परंतु अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. यावेळी अग्निशामक दलाचे किशोर जाधव (अग्निशमन अधिकारी),गोरकनाथ ढोकणे (फायरमन), कृष्णा जंगले( लिडिंग फायरमन ), अनिकेत कापले (वाहन चालक), प्रकाश तिकडे (फायरमन) अनिकेत ओव्हल (वाहन चालक) यांनी मृतदेह बाहेर काढला.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button