चक्री जुगारावर DYSP पथकाचा दोन ठिकाणी छापा.
₹1.37 लाखांचा मुद्देमाल जप्त;DYSP पथक "ॲक्शन "मोडवर.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना देत आहेत यामुळे अवैध धंद्याच्या प्रमाण कमी झाले असले तरी काही लोक चोरीछुपे जुगार खेळत असून त्यावर पोलीस कारवाया करत आहेत.
बीड शहर तसेच ग्रामीण भागात मटका पत्त्याचे क्लब,चक्री सुरू असून यावर पोलीस उपाधीक्षक यांचे विशेष पथक धडक कारवाया करत असल्याने अवैध धंदे करणारात खळबळ उडाली.
मागील काही दिवसात बीड शहरातील काही भागात डी वाय एस पी पथकाने पत्त्याचे क्लब, वाळू तसेच अवैध मुरूम उपसावर कारवाई केल्याने पथक ॲक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे.
बीड शहरातील अवैध चक्री जुगारावर DYSP पथकाने शुक्रवारी (दि. 24 जुलै) सलग दोन ठिकाणी धाड टाकून एकूण ₹1 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिली कारवाई दुपारी 2.06 वाजता पांगरी रोडवरील डायमंड मटण शॉपसमोर करण्यात आली. येथे चक्री नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ₹73,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर दुपारी 2.33 वाजता सम्राट चौक, बीड येथे दुसरी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी एका आरोपीला ताब्यात घेऊन ₹63,100 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून ₹1,37,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद, अविनाश सानप, संतोष रणदिवे,कुलदीप औसरमल,शशिकांत ढाकणे आणि विशाल जगताप यांनी केली.









