ब्रेकिंग न्यूज

DYSP पथकाचा मटका अड्ड्यावर छापा.

एक लाखांच्या मुद्देमालासह सात जुगारी ताब्यात.DYSP पथक "ॲक्शन मोडवर"

बीड (प्रतिनिधी): बीडमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात DYSP विशेष पथकाने अक्षरशः धडाकाच लावला आहे. वाळू, मुरूम, गुटखा, चक्री जुगार आणि पत्त्यांच्या क्लबवर सलग कारवाया केल्यानंतर आता ‘मिलन नाईट’ मटका अड्ड्यावर धाड टाकून सात जुगाऱ्यांना ताब्यात घेत ₹१,०१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

२२ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता नाळवंडी रोडवरील गांधीनगर परिसरातील अलकबीर फंक्शन हॉलसमोरील मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य आणि हिरो कंपनीची दुचाकी असा एकूण ₹१,०१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सात जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून DYSP विशेष पथकाने अवैध धंद्यांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. मागील आठवड्यात गांधीनगर परिसरातील अवैध वाळू साठ्यावर धडक कारवाई करून सुमारे ₹३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर इमामपूर परिसरातील अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करत दोन पोकलेन आणि पाच टिप्परांसह जवळपास ₹२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा, चक्री जुगार आणि पत्त्यांच्या क्लबवरही धडक कारवाया करून विशेष पथकाने अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सय्यद तसेच पोलीस अंमलदार सोनवणे, सानप, रणदिवे, औसरमल, ढाकणे, जगताप आणि पेठ बीड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

बीड शहर व तालुक्यात मटका, गुटखा, पत्याचे क्लब,अवैध मुरूम,वाळू,चक्रीसह इतर अवैद्यावर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती IPS पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button