अवैध दारू वाहतूकीवर बीड शहर पोलिसांचा छापा.
विदेशी दारूसह दोघे ताब्यात;वाहन जप्त,बीड शहर DB पथकाची मोठी कारवाई.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत चोरट्या विक्रीसाठी नेण्यात येत असलेला विदेशी दारूसाठा जप्त केला. कारंजा रोड परिसरात DB (डिटेक्शन ब्रँच) पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत सुमारे 40 हजार रुपये किमतीची विदेशी दारू तसेच 1 लाख रुपये किमतीची मोपेड (मोसा) असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम, तसेच बीड शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शहेंशा सय्यद, गहिनीनाथ बावणकर, राजेंद्र मुंडे, पोलीस अंमलदार शेख इलियास, राम पवार आणि मंगेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





