प्लॉटिंग व्यावसायिकाला मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न?
शिवसेना युवा जिल्हाप्रमुखासह पाच जणांवर गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील जालना रोडवरील हिना पेट्रोल पंपाजवळ प्लॉटिंग व्यावसायिक महावीर हुकुमचंद कोठारी (वय ५१) यांना जुन्या पैशांच्या व्यवहारातून बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपहरनाचा प्रयत्न करण्यात आला या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली.
कोठारी यांनी आपली सुटका करून घेत उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल होत पुढील उपचारासाठी बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. व्याजाच्या पैशातून मारहाण झाल्याची चर्चा होती.
शिवसेना युवा जिल्हाप्रमुख गणेश गोरख शिराळे, अक्षय शिराळे व त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांनी जबरदस्तीने फॉर्च्युनर गाडीत बसवून अपहरण केल्याचा आरोप प्लॉटिंग व्यवसाय कोठारी यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, जाधव पेट्रोल पंपाजवळ नेल्यानंतर कोठारी यांना मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्यातून कोठारींनी सुटका करून घेतली. या प्रकरणी शिवसेना युवा जिल्हाप्रमुख गणेश गोरख शिराळे, अक्षय शिराळे व इतर अनोळखी साथीदारांविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत मारहाण, अपहरण, जीवे मारण्याची धमकी यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
माझ्यावर देखील खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता :
कोठारी यांना गुन्हा दाखल न करण्यासाठी अनेकांनी दबाव टाकले देखील माहिती सांगत माझ्यावर खोटे होणे देखील दाखल होण्याची शक्यता असल्याने बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली असून सत्य परिस्थिती सांगितल्याची माहिती प्रसार माध्यमांसमोर सांगितली.





