ब्रेकिंग न्यूज

खजाना विहिरीजवळ भीषण अपघात.

दुचाकीस्वार गंभीर जखमी;संभाजीनगरला हलवले.

बीड(प्रतिनिधी)बीड-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहीर, आहेरवडगाव फाट्यासमोर गुरुवारी (दि. 23 जुलै) सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या दिशेने डाळिंब घेऊन जाणारा RJ 09 JP 3230 क्रमांकाचा भरधाव ट्रक वळणावर नियंत्रण सुटून अचानक पलटी झाला.

यावेळी ट्रकच्या बाजूने जात असलेल्या एका दुचाकीवर ट्रक कोसळल्याने दुचाकीस्वार व ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दुचाकी ट्रकखाली अडकली. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य करत जखमीला बाहेर काढून बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, ट्रकखाली आणखी कोणी अडकले आहे का, याची खातरजमा करण्यासाठी बीड ग्रामीण पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ट्रकमधील टोमॅटो रस्त्यावर विखुरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. अधिक माहिती मिळाल्यानंतर सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button