ब्रेकिंग न्यूज

आयुक्त तुकाराम मुंडे यांनच्या पथकाचा अकोल्यात बनावट गुटखा कारखान्यावर छापा.

१ कोटी २० लाखाच्या मुद्देमाल जप्त,तीन आरोपी ताब्यात.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यात गुटखा, दुध तसेच इतर अन्नपदार्थात भेसळ करणारावर धडक कारवायात करोड रुपयाचा भेसळीत माल जप्त करण्यात आला असून भेसळखोराचे धाबे दानाणले आहेत.

अकोल्यातील एमआयडीसी ग्रोथ सेंटर क्रमांक ४ येथे सुरू असलेल्या बनावट गुटखा निर्मितीच्या मोठ्या रॅकेटवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा बनावट गुटखा, कच्चा माल, पॅकिंग साहित्य व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे राज्यभरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाला काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने तीन ते चार दिवस पाळत ठेवून कारवाईचे नियोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवर माहिती फुटू नये म्हणून शेजारील जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचे विशेष पथक अकोल्यात बोलावण्यात आले.

 दिनांक १६ गुरुवारी रोजी सकाळी सहा वाजता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात विविध नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गुटखा तयार करून त्याचे पॅकिंग सुरू असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान विमल, वाह, पान बहार आणि रिच टेन या ब्रँडच्या नावाखाली बनावट गुटखा तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठविला जात असल्याचे समोर आले. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी मूळ उत्पादनासारखे पॅकिंग वापरले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या कारवाईत छत्तीसगडमधील तीन जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार गौरव शर्मा हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासनाचे अकोला सहआयुक्त देवानंद वीर यांच्यासह अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केली.राज्यभरात गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केल्याने त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

राज्यात अवैध गुटखा निर्मिती आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने उघडलेली ही मोहीम आणखी तीव्र होण्याचे संकेत असून, या कारवाईमुळे गुटखा माफियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button