ब्रेकिंग न्यूज

गेवराई पोलिसांचा वाळू माफियांना दणका.

₹27.60 लाखांच्या मुद्देमालासह हायवा व अशोक लेलँड जप्त

बीड ( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन स्वतंत्र कारवाया करून ₹27 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक भारत बेंझ हायवा आणि एक अशोक लेलँड कंपनीचा ‘बडा दोस्त’ पिकअप ताब्यात घेण्यात आला असून दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशानुसार गेवराई पोलिसांनी विशेष पथक तयार करून ही मोहीम राबवली.

पहिली कारवाई 13 जुलै 2026 रोजी पहाटे 3.10 वाजता दत्तराज पार्क, गेवराई बायपास रोड येथे करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान MH-12-QG-4497 क्रमांकाचा भारत बेंझ हायवा अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी हायवा व त्यातील वाळूसह ₹20.30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुंदर राठोड करत आहेत.

याच दिवशी रात्री 10.50 वाजता दुसऱ्या कारवाईत साठेनगर ते मोंढा नाका मार्गावरील पुलाजवळ विना क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ पिकअप अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला. या कारवाईत ₹7.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश गव्हाणे करत आहेत.

या दोन्ही कारवायांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील आपली कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

सदर कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड व अनिल कटके, उप विभागीय पोलीस अधिकारी, गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पवार, पोलीस निरीक्षक गेवराई, ग्रेपोउपनि. श्रींमत उबाळे, पोह/कल्याण राठोड, पोकॉ/गोरक्ष डोके, पोकॉ/ जितेंद्र ओव्हाळ, पोकॉ/ रामराजे काकडे, पोकॉ/ विनोद कुटे, चालक/ग्रेपोउपनि. इसाक शेख व चापोह/राजेंद्र सांगळे यांनी सदर कारवाईत यांनी सहभाग घेतला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button