ब्रेकिंग न्यूज

जात पडताळणी विभागात ट्रॅप.

कास्ट व्हॅलेडीटीसाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या रंगेहात जाळ्यात.

बीड(प्रतिनिधी) दिनांक 10 जुलै शुक्रवार रोजी दुपारी बीड येथील समाज कल्याण कार्यालयातील जात पडताळणी (कास्ट व्हॅलिडिटी) विभागातील अधिकारी अण्णासाहेब राठोड याने जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ₹3 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे ₹3 हजारांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यामध्ये अण्णासाहेब राठोड लाचेची रक्कम स्वीकारताना जेरबंद झाले.

बीड शहरातील जात पडताळणी विभागात मागील काही महिन्यांपासून विद्यार्थी आणि नागरिकांकडून जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या कामांसाठी व पडताळणी मधील त्रुटी काढण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. मात्र, अनेक नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात होते. अखेर एसीबीच्या कारवाईमुळे या चर्चांना पुष्टी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

गेल्या काही महिन्यांत बीड शहर आणि जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांतील लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही कारवाई उपअधीक्षक सोपान चिटमपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पथकात मच्छिंद्र बिडकर, अमोल खरसाडे, पांडुरंग काचगुंडे, प्रदीप सुरवसे, बिभीषण सांगळे, राजकुमार आघाव आणि अंबादास पुरी यांचा समावेश होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button