“चक्री”जुगारावर पोलिसांचा छापा.
३० हजारांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. राजीव नगर परिसरात एका गाळ्यात सुरू असलेल्या ‘चक्री’ जुगारावर छापा टाकून रोख रक्कम व साहित्य असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत गुटखा, मटका, पत्त्यांचे क्लब, अवैध दारू यांसारखे धंदे वाढल्याचे चित्र असून, याकडे शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाया थंडावल्याचे दिसत आहे.स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान,राजीव नगर भागात एका गाळ्यात चक्री जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. हा गाळा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा असल्याची देखील चर्चा आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.एकाला ताब्यात घेण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर तसेच कर्मचारी राहुल शिंदे,आनंद मस्के,राख मेजर यांनी केली.





