ब्रेकिंग न्यूज

कंटेनरची दुचाकीला मागून धडक; महिलेचा जागीच मृत्यू,दोघे जखमी.

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; साठे चौकातील दुर्दैवी घटना

बीड, दिनांक  ६ मे बुधवार रोजी बीड शहरातील जालना रोडवरील साठे चौकात बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजता  मागून जोरात धडक दिली या भीषण अपघात एक महिला जागीच ठार झाली तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

 कंटेनर साठी चौकात आल्यावर चालताना दुचाकी जवळ आल्याचे लक्षात न आल्याने त्याने हिचकी क्रमांक  MH 14 HL 9371ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रतिभा चौधरी या दुचाकी और मागे बसले होत्या त्या कंटेनरच्या धडकेत खाली पडल्यावर कंटेनर खाली आल्याने यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात देखील गर्दी झाली होती तसेच या अपघातामुळे काही काळ साठे चौक परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, मृत प्रतिभा चौधरी या आपल्या भावाच्या लग्नासाठी बार्शी तालुक्यातून माहेरी आल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांवर लग्न ठरलेले असताना, लग्नासाठी खरेदी करण्यासाठी त्या नातेवाईकांसोबत बीडला आल्या होत्या. मात्र साठे चौकात झालेल्या या दुर्दैवी अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button