ब्रेकिंग न्यूज

भव्यदिव्य पालखी रिंगण सोहळा अंबाजोगाईत सम्पन्न

 

*अंबाजोगाईत मराठवाड्यातील एकमेव अश्व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न…*
अंबाजोगाई- प्रतिनिधी :–
मराठवाड्यातील एकमेव अश्व रिंगण सोहळा अंबाजोगाई येथे आमदार सौ. नमिताताई अक्षय मुंदडा, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) आणि पन्नगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षयभैया मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहपूर्ण वाटावरणात संपन्न झाला.

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीतील अश्वाने पारंपरिक पद्धतीने रिंगण घालत उपस्थित भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. या पवित्र रिंगण सोहळ्याने वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

सोहळ्यादरम्यान बालगोपाळांनी विविध पारंपरिक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विठुरायाच्या नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले.

या भव्य अश्व रिंगण सोहळ्यास अंबाजोगाई शहरासह परिसरातील हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेतला. शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने अंबाजोगाईच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button