ब्रेकिंग न्यूज

भरधाव इनोव्हाची मागून जोरदार धडक:दिड लाखाचे नुकसान:

गतिरोधक न दिसल्याने अपघात ..!

भरधावं इनोव्हा पाठीमागून कारवर धडकली,दिड लाखाची हानी,गतिरोधक न दिसल्यामुळे अपघात
अंबाजोगाई/प्रतिनिधी :——

परभणी येथून ईटॉस कारने धाराशिव कडे जाणाऱ्या आशिष दीपक लोंढे हे शनिवारी दि.२ मे रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान केज येथील जयभवांनी चौकात आले असता धारूर कडुन केज कडे आलेल्या आलेल्या एम एच ०४ / ई एच ४३६८या ग्रे रंगाच्या इनोव्हाच्या चालकाने (नाव माहित नाही) आपल्या ताब्यातील इनोव्हा गाडी भरधावं वेगाने,व निष्काळजी पने,चालवून आशिष लोंढे यांच्या ईटॉस कारला पाठी मागून जोराची धडक देऊन त्यांच्या गाडीचे दिड लाख रुपयाची हानी केली आहे.या प्रकरणी आशिष लोंढे,रा.प्रमिला नगर,धाराशिव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इनोव्हा गाडीच्या चालकाविरुद्ध केज पोलिसात शनिवारी मध्यरात्री १२-०० वाजण्याच्या दरम्यान गून्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली महिला जमादार अनिता दगडखैर या पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button