
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील पालवन चौक परिसरात राहणारे राहुल सिताराम जगताप (वय ३७) यांनी सोमवारी (दि. ४ मे) सकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राहुल हा अत्यंत कष्टाळू व मेहनती होता मधल्या काळात तो संभाजीनगर येथे कामासाठी गेला होता परंतु मागील आठवड्यात तो बीडला येऊन त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याने हळूहळू व्यक्त केली जात आहे.
मृतांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंकुश नगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.




