“नारीशक्ती वंदन विधेयक” विरोधी मतदान करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडी विरोधात अंबेजोगाई शिवसेने कडून निषेध*
अंबाजोगाई - शिवसेना


*संसदेत ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ विरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीचा शिवसेनेच्या वतीने निषेध*
अबाजोगाई (प्रतिनिधी)
संसदेत नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून माता-भगिनींचा घटनात्मक हक्क हिसकावण्याचा प्रयत्न काँग्रेस व इंडिया आघाडीने केला असून त्यांचा खरा चेहरा देशासमोर उघडा झाला आहे. याचा निषेध आज उपजिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आला.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, संपर्क नेते प्रकाश आबिटकर, संपर्कप्रमुख मनोज शिंदे,मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांच्या आदेशानुसार साहेबांच्या लाडक्या बहिणी आता आपल्या सन्मानासाठी एकवटल्या आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा संघटक गजानन मुडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी गजानन मुडेगावकर, बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी खैरमोडे, ज्येष्ठ शिवसेना नेते दादासाहेब देशमुख, भाऊसाहेब निसर्गंध, विरसिंग टाक, धनंजय बनसोडे, फेरोज शेख, मेहमूद बेग, महिला आघाडीच्या आकांक्षा लोहटे, अनिता गुजर, पुजा कांबळे, सुनीता कांबळे, सुरैय्या शेख आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, महिला आघाडीच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी शिवसेना जिंदाबाद, शिंदे साहेब आगे बढो, काँग्रेस व इंडिया आघाडीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पार्श्वभूमी- अंबाजोगाई प्रतिनिधी





