ब्रेकिंग न्यूज

जनावरे चोरी प्रकरणी तिघे पोलिसांच्या ताब्यात.

४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त;पेठ बीड पोलिसांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) पेठ बीड पोलिसांनी जनावरे चोरी प्रकरणी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २० एप्रिल २०२६ रोजी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे आपल्या पथकासह पेठ बीड हद्दीत गस्त घालत असताना मोबाईलवरून माहिती मिळाली की, जी.एन. फंक्शन हॉलजवळ काही नागरिकांनी जनावरे चोरणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या पिकअप वाहनास पकडून ठेवले आहे. माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी आरोपींच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्र. MH 23 AU 1015) तपासली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे चारही पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी त्वरित आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी चोरी करून नेत असल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशीम जाफर कुरेशी, अजिम आझाद कुरेशी (दोघे रा. महमदीया कॉलनी) व शहनवाज एजाज कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, पेठ बीड) अशी आहेत.

या प्रकरणी फिर्यादी सईद अब्दुल करीम कुरेशी (वय ५१, रा. मोमीनपुरा) यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींकडून वाहन व जनावरे असा एकूण ४,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.

ही कारवाई ही पोलिस अधिक्षक नवनीत काँवत अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी वेंकटराम भा.पो.से यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक मन्सुर शहा, पोहेका / 1353 सुभाष मोठे, पोह/1065 नितीश माने पोलीस नाईक /1835 अजित शिकेतोड, पोलिस कॉस्टेबल/2218 विष्णु गुजर, पोशि/1987 गिरी. पोशि/1551 अशोक परझने पोशि/2146 शिवाजी राख यांनी या गुन्हयातील आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेतले व सदर गुन्हयात अटक केले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button