डॉ.सुनील बोबडेंनी केली वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती.
सर्जरीला केले 'बायपास';क्रॉनिक टोटल ऑक्लूजन अँजिओप्लास्टी प्रथमच बीडमध्ये यशस्वी.

बीड दि.१३ (प्रतिनिधी)-अल्पवधीत बीड जिल्ह्यात हृद्यरोगासाठी नावलौकिक मिळवलेल्या मेडिकेयर हॉस्पिटलमधील डॉ.सुनील बोबडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती केली आहे.क्रॉनिक टोटल ऑक्लूजन (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांपैकी एक धमनी ३ महिने किंवा त्याहून अधिक काळासाठी पूर्णपणे १०० टक्के ब्लॉक असते.) अशी अँजिओप्लास्टी पहिल्यांदाच बीडमध्ये यशस्वी केली आहे.हृदयरोगतज्ञ डॉ.सुनील बोबडे यांनी बीडमध्ये अतिशय दुर्मिळ आणि गंभीर असलेल्या रुग्णावर केलेल्या या अतिजोखमीच्या शस्त्रक्रियेमुळे त्या रुग्णाला तर जीवदान मिळालेच पण हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी देखील ही शस्त्रक्रिया दिलासा आणि आशेची किरण ठरणार आहे.
पांडुरंग गमे (वय-४९) असे रुग्णाचे नाव असून त्या मागील अनेक महिन्यांपासून ह्रदयाच्या आजाराने त्रस्त होते.त्यामुळे त्यांनी मेडिकेयर हॉस्पिटलला भेट देऊन डॉ.सुनील बोबडे यांच्याकडे निदान केले.यावेळी डॉ.बोबडे यांनी रुग्णाच्या तपासण्या केल्यानंतर रुग्णाला क्रॉनिक टोटल ऑक्लुजन ही गंभीर समस्या असल्याचे स्पष्ट झाले.गमे यांना आपल्याला झालेल्या आजाराबाबत माहिती नव्हती,त्यांचे नातेवाईक देखील तणावात होते.कारण बीड जिल्ह्यात अश्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करायच्या झाल्या तर छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे.मुंबईसारख्या ठिकाणी धाव घ्यावी लागायची.मात्र डॉ.सुनील बोबडे यांनी रुग्ण आणि नातेवाईकांना विश्वास देत अतिशय जोखमीची अशी शस्त्रक्रिया बीडमध्ये पहिल्यांदाच करत वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती केली आहे.क्रॉनिक टोटल ऑक्लूजनवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णाला जीवदान मिळाले असून बीड जिल्ह्यातून डॉ.सुनील बोबडे यांच्या शस्त्रक्रियेबाबत अभिनंदन केले जात आहे.
सर्जरीला केले ‘बायपास’
रुग्ण पांडुरंग गमे यांना गेल्या काही काळापासून छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीअंती त्यांच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी १००% पूर्णपणे बंद असल्याचे समोर आले. अशा रुग्णांवर सहसा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो, कारण १००% बंद असलेली रक्तवाहिनी अँजिओप्लास्टीद्वारे उघडणे अत्यंत जोखमीचे आणि कौशल्याचे काम असते.मात्र हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुनील बोबडे व त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून शरीराची मोठी चिरफाड न करता, केवळ अँजिओप्लास्टीद्वारे ही १००% बंद असलेली रक्तवाहिनी यशस्वीपणे पूर्ववत केली.सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.











