ब्रेकिंग न्यूज

हुंड्यातील १० लाखांसाठी विवाहीतेचा छळ;पतीसह सासरच्यां विरोधात तक्रार दाखल.

पतीच्या विवाहबाह्य संबंधास विरोध केल्याने छळ,गर्भपातास कारणीभूत ठरल्याचा आरोप;मुलापासून दूर ठेवले.

बीड(प्रतिनिधी)दि. ११ जून बीड जिल्ह्यातील एका विवाहित महिलेने पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाविरोधात जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्षाकडे धाव घेतली आहे. हुंड्यासाठी १० लाख रुपयांची मागणी, मानसिक व शारीरिक छळ, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच अल्पवयीन मुलापासून दूर ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, विवाहानंतर सातत्याने माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. वडिलांचे घर विकून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आली. मागणी न मान्य केल्याने शिवीगाळ, मानसिक त्रास व मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पतीचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त करत त्यास विरोध केल्यानंतर छळ अधिक वाढल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. संबंधित महिलेला दुसरी पत्नी म्हणून स्वीकारण्याचा दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये गरोदरपणात झालेल्या कथित मारहाण व तणावामुळे प्रकृती बिघडून १ जानेवारी २०२४ रोजी गर्भपात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आठ वर्षांच्या मुलास आईपासून दूर नेण्यात आले असून त्याच्या भेटीस अडथळे निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सध्या देखील १० लाख रुपयांच्या मागणीसाठी दबाव टाकून पैसे न दिल्यास घटस्फोट देण्याची तसेच तक्रारदार व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि तक्रारदार महिलेसह तिच्या मुलाला संरक्षण द्यावे, अशी मागणी महिला व बाल संरक्षण कक्षाकडे करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button