ब्रेकिंग न्यूज

चक्क स्वच्छतागृहाच्या जागेवर हॉटेल? 

नगरपालिकेच्या जागेवर हॉटेल कसे? तात्काळ कारवाईची मागणी.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात मागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून अनेक मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ मोकळे होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही अतिक्रमणाचे प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. याकडे मात्र बीड नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

 बीड शहरातील थोरातवाडी ते जुने भगवान विद्यालय रोडवरील धांडे गल्ली परिसरात चक्क नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाच्या जागेवर अतिक्रमण करून हॉटेल सुरू केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 संबंधित स्वच्छतागृह मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून त्याच जागेवर अतिक्रमण झाल्याचे दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागातील स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे तात्काळ या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचत असून दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक आणि ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

“नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाच्या जागेवर हॉटेल कोणाच्या परवानगीने सुरू करण्यात आले?” या स्वच्छतागृहाची जागा बळकवण्याचा प्रयत्न होत आहे का?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रकरणात संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मौन का बाळगत आहे?अशीही चर्चा परिसरात सुरू आहे.

 धांडे गल्ली,तेरवी लाईन, थोरातवाडी, माळे गल्ली या भागातील नागरिकांच्या मागणीसस्तव नगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी या भागात स्वच्छतागृह सुरू करण्यात आले होते परंतु 

 मागील काही वर्षापासून हे स्वच्छतागृह बंद व मोडकळीस आलेल्या अवस्थेत दिसून येत असून मात्र या जागेवर हॉटेल कसे थाटले असा सर्वसामान्य प्रश्न पडला आहे.

स्थानिक नागरिकांनी बीड नगरपालिकेने या जागेची तात्काळ पाहणी करून अतिक्रमण हटवावे आणि स्वच्छतागृह पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच अतिक्रमणामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्वच्छतागृहाच्या जागेवरील उभारण्यात आलेले शेड हॉटेल तात्काळ हटवून स्वच्छताग्रह सुरू करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button