ब्रेकिंग न्यूज

माजलगावच्या पेट्रोल पंपावर मद्यधुंद तरुणांचा गोंधळ.

तिघां विरोधात गुन्हा दाखल.

माजलगाव (प्रतिनिधी) : शहरालगतच्या करवा पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री मद्यधुंद तरुणांनी दादागिरी करत गोंधळ घातल्याची घटना घडली. रांगेत न थांबता जबरदस्तीने पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तीन तरुण दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी रांगेत न उभा राहता कर्मचाऱ्यांशी वाद घालत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका कर्मचाऱ्याकडून पेट्रोल भरण्याचा नोजल हिसकावून स्वतःच गाडीत पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कर्मचारी सचिन दत्तात्रेय नरसाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन संशयितांची ओळख पटवली आहे. तिसऱ्या तरुणाचा शोध सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक माकने करत आहेत.

दरम्यान, आरोपींना अटक होईपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा पंपचालकांनी दिला आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्यांमध्ये एका नगरसेवकाच्या भावाचा समावेश असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button