ब्रेकिंग न्यूज

गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा.

७.७५ लाखांचा साठा जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातलेली असतानाही बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्था.गु.शा.) पथकाने दिनांक 13 जुलै रविवार रोजी गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे धडक कारवाई करत तब्बल ७ लाख ७५ हजार ५४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, अमोल महादेवराव धोंडरे हा त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवून त्याची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून एकूण ₹७,७५,५४० किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासनाने अनेक वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी लागू केली असली तरी बीड जिल्ह्यात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत अनेक पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात गुटखा नेमका येतो कुठून असा देखील प्रश्न पडला असून नाकाबंदी करून असा गुटखा वाहतूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी देखील मागणी होत आहे.अशा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांमुळे युवकांसह सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, पोलीस हवालदार अंकुश वरपे, गोविंद राख, पोलीस अंमलदार बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांनी केली.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी जिल्हाभर सुरू असलेल्या गुटखा विक्रीच्या साखळीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस,अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सातत्याने धडक कारवाया करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button