बीड जिल्ह्यात पुन्हा खून ! मृतदेह ठेवला पोलीस ठाण्यात.
भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या; कुटुंबीय,नातेवाईकाचा पोलीस ठाण्यात आक्रोश.

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यात शुल्लक कारणावरून मारामारी कोणाच्या घटनेत वाढ झाली असून तेज येथील विलास घुले हत्या प्रकरण ताजे असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी रात्री एका तेवीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे.
ज्ञानेश्वर वाकडे (वय २३, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव असून या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर वाकडे हा आंबेजोगाई येथील हॉटेलवर कुक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगाव या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. हे दोघे अण्णाभाऊ साठे चौकात आले असता काही जणांनी त्यांची दुचाकी अचानक अडवली. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडून ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या भीषण घटनेनंतर मयत ज्ञानेश्वरचे संतप्त आणि दुःखी नातेवाईक तक्रार देण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बसून आहेत. अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झालेला नसून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
कुटुंबीय व नातेवाईकांनी ज्ञानेश्वरी याचा मृतदेह ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून ठेवला यावेळी कुटुंबांनी आक्रोशित करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची.









