जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा.
१.३६ लाखांचा मुद्देमालासह चार जुगारी ताब्यात;बीड ग्रामीण पोलिसांची कामगिरी.

बीड(प्रतिनिधी)बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत रोख रक्कम, तीन मोटारसायकली, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ७.२० वाजता महाकुडे वस्ती, तळेगाव शिवार येथे पत्र्याच्या शेडजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी झन्ना-मन्ना नावाचा जुगार पैशांची बाजी लावून खेळत व खेळवत असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत मोहन अर्जून लंबाडे (रा. बलभीम नगर, बीड), दत्ता रामराव मैड (रा. शाहूनगर, बीड), जितेंद्र अरुण जोजारे (रा. शनिवार पेठ, बीड) यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २५८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज जोगदंड, सोमनाथ जायभाये, अशोक गायकवाड तसेच पोलीस अंमलदार युवराज पवार आणि अभिमान जायभाये यांनी केली. कारवाई करण्यात आली असून, बीड ग्रामीण हद्दीतील अवैध धंद्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.









