४०°C उष्णतेतही वाहतूक पोलिस रसत्यावर.
वाहतूक पोलिसांनी पेट्रोल पंपाववरील वाहतूक कोंडी काही मिनिटांत सोडवली..

बीड (प्रतिनिधी)बीड शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
बीड शहरात सकाळ पासून पंपावर नो स्टॉक चे फलक लावल्याने वाहधारक हैराण झाले होते.शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास बार्शी नाका येथील भारत पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती पसरताच वाहनांची मोठी रांग लागली.
या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे सोमेश्वर मंदिर ते बार्शी नाका चौक या मार्गावर वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
घटनेची माहिती मिळताच बीड शहर ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ४० अंश सेल्सिअस तापमानातही उन्हाची पर्वा न करता पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
या कामगिरीत ट्रॅफिक पोलिस निरीक्षक दिलीपकुमार, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पांडुरंग दराडे खेडकर, पो. ह. सुनील जाधव, पो. ह. अडाणीत मुंडे, पो. ह. चेतन दहातोंडे तसेच पेठ बीडचे पो. ह. अल्ताफ शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
नागरिकांनी ट्रॅफिक पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले. अशा प्रकारची जबाबदार सेवा कायम राहिल्यास शहरातील वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते.





