अधीक्षक बाल निरीक्षण गृहातील अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
गार्ड भरतीसाठी 45 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बीड( प्रतिनिधी) बीडमध्ये लाचलुचपत प्रकरणांची मालिका सुरूच असून, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाल निरीक्षण गृहातील अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दिनांक 13 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी बाल निरीक्षण गृहातील अधीक्षक कांबळे अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातील गार्डच्या भरतीसाठी तब्बल ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तडजोडीनंतर ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.
मागील महिन्यातच या बालसुधारगृहातील दोन विद्यार्थी पसर झाले होते, यामुळे सुरक्षा विशेषण व्यक्त होत होता.
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर एसीबीकडून कारवाईचा फास अधिक घट्ट केला जात असून, या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात कठोर संदेश गेला आहे.
या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






