ब्रेकिंग न्यूज

प्रभाग १८ मध्ये विकासाला वेग;प्रत्यक्षात रस्ते व नाली कामांना सुरुवात.

नगरसेवक आशफाक इनामदार यांच्या पाठपुराव्याला यश. 

 

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकासकामांना अखेर गती मिळाली असून नगरसेवक अशफाक इनामदार यांनी रस्ते व नाली बांधकामांना सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभागातील खासबाग परिसरातील दलित वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून रस्ते व नालींची समस्या प्रलंबित होती. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही कामे झाली नव्हती. मात्र, नगरसेवक इनामदार यांनी या प्रश्नाची दखल घेत पाठपुरावा केला आणि तात्काळ काम सुरू करून दिले.

या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी नगरसेवकांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. प्रभागातील उर्वरित भागातही रस्ते, नाली तसेच इतर मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी Ship आहे.

यामुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकासाच्या कामांना वेग मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.यावेळी अकबर सय्यद, इकबाल सर नदीम सय्यद सह या भागातील नागरिक उपस्थित होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button