ब्रेकिंग न्यूज

पेट्रोल-डिझेलच्या कृत्रिम टंचाई विरोधात मोर्चा.

रखरखत्या उन्हात जोरदार घोषणाबाजी; विश्वगति ट्रान्सपोर्टचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘विश्वगती मोटार चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन’च्या (महाराष्ट्र राज्य) वतीने आज, दि. ४ मे रोजी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल आलं तर लांब लांबच लांब लागत असून परिणामी ट्रान्सपोर्ट व छोट्या मोठ्या व्यवसाय सह रिक्षा व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे मालवाहतूक ठप्प होण्याच्या स्थितीत आहे. परिणामी वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सर्वसामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि कृत्रिम टंचाईला आळा घालावा, ही मुख्य मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मोर्चापूर्वी सकाळी ११ वाजता शहरातील ‘अन्विता हॉटेल’ येथे सर्व ट्रान्सपोर्ट सदस्य, मोटार मालक व चालकांनी एकत्र येऊन रखरखत्या उन्हामध्ये घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला या आंदोलनात ट्रान्सपोर्ट संघटनेसह रिक्षा चालक-मालक संघटना देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष विजय काकडे यांनी केले होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button