ब्रेकिंग न्यूज

“केस मागे घे”म्हणत कोर्टातच जीवे मारण्याची धमकी.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरा म्युझिक असलेल्या आहेर वडगाव या गावात शेतीच्या वादातून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरातच एका व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार कचरु लहानु गायकवाड (वय 56, रा. आहेर वडगाव, ता. जि. बीड)हे आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या भावकीतील काही व्यक्तींमध्ये शेतीच्या वादावरून न्यायालयात खटला सुरू आहे.

दि. 4 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता कोर्टाची तारीख, सुनावणी असल्याने ते न्यायालयात गेले असता भावकीतील राजहंस शेषेराव गायकवाड (रा. विडा), रोहीदास श्रीरंग गायकवाड व जालिंदर नामदेव गायकवाड (दोघेही रा. आहेर वडगाव) यांनी “केस मागे घ्या” असे म्हणत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 बीड जिल्हा न्यायालयातच तक्रारदाराला धमकी दिल्याने या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.पोलिसांनी प.एन.सी./2026 अंतर्गत भादंवि ऐवजी लागू असलेल्या बीएनएस कलम 115(2), 351(2), 3(5) नुसार अदखलपात्र अहवाल नोंदवला आहे. पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button