दिवसाढवळ्या बीड शहारातून वृद्ध महिलेची दागिने चोरीले.
दागिने चोरणारे टोळी सक्रिय?शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरात मागील काही महिन्यापासून वृद्ध व रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरीच्या घटना घडल्या आहेत यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दागिने चोरी होण्याच्या घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडत असल्याने दागिने चोरणारी टोळी सक्रिय आहे का?असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे.
बीड शहरातील नगर नाका परिसरात एका वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
देवईबाई किसन बेद्रे (वय 75, रा. निरगुडी, ता. पयेऱात्री) या घरकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 एप्रिल रोजी त्या पूर्णवादी बँकेत एफडीची मुदत वाढविण्यासाठी बीड येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या नगर नाका येथील बेंगलोर बेकरी समोर बसची वाट पाहत थांबल्या होत्या.
दरम्यान, एक अनोळखी महिला त्यांच्याशी संवाद साधत जवळ आली आणि “गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा” असा सल्ला दिला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देवईबाई यांनी गळ्यातील सोन्याची पोत काढून पिशवीत ठेवली. त्यानंतर बसमध्ये चढताना त्या महिलेनं मागून धक्का देत गोंधळ निर्माण केला.
घरी परतल्यानंतर देवईबाईंना आपली पिशवी हरवल्याचे लक्षात आले. पिशवीत ठेवलेली सोन्याची पोत तसेच बँकेचे कागदपत्र चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने बीडला येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दागिने चोरणाऱ्या अज्ञात महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला. दागिने चोरीच्या घटना घडत असल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महिलांनी नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





