ब्रेकिंग न्यूज

स्व.संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव.

स्वरूपानंद देशमुख 92 मताने विजयी. बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ह्या निकालाकडे.

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर आला असून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ग्रामपंचायत सदस्य स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवत सरपंचपदावर झेंडा रोवला.

मस्साजोग गावातील या निवडणुकीकडे स्थानिकांसह राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या कौलामुळे अश्विनी देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या मतदानात एकूण २,०८० मतदारांपैकी १,७४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे तब्बल ८४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मतदानादरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आज झालेल्या मतमोजणीनंतर अखेर स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले, तर अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button