ब्रेकिंग न्यूज

जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा.

4,25,000/-रू चा मुद्देमालासह सहा जुगारी ताब्यात;गेवराई पोलिसांची धडक कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक नवनती काँवत, यांच्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार गेवराई पोलीसांनी पथक तयार करून दिनांक 06.07.2026 रोजी सायंकाळी ६ वाजता अंतरवली जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत देवपिंप्री शिवारतील गायराण जमीनीतील गोठ्यामध्ये तीर्रट नावाचा जुगारावर अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी 06 इसम जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून रोख रक्कम व मोटार सायकल असे एकूण 4,25,000/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरकार तर्फे फिर्यादीवरून पोलीस ठाणे गवेराई येथे गुरनं.411/20226, कलम-12(अ) म.जु.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.ह.राठोड हे करत आहेत.

सदर कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड,समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड अनिल कटके, उप विभागीय पोलीस अधिकारी, गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पवार, पोलीस निरीक्षक गेवराई, पोउपनि. अप्पासाहेब रोकडे, पोह/सुंदर राठोड, पोह.रविंद्र राऊत, पोकॉ.धनंजय सुळ, पोकॉ रामराजे यांनी सदर कारवाईत यांनी सहभाग घेतला.

बीड शहर, शिवाजीनगर,पेठ बीड व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत देखील राजरोस विनापरवाना पत्त्याची अनेक क्लब सुरू असून यावर देखील कारवाई करण्याची गरज आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button