ब्रेकिंग न्यूज

एसीबीचा महावितरण कार्यकारी अभियंत्याला जोरदार झटका.

ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी 5000/ची लाच घेताना स्वतःच्या केबिनमध्ये जाळ्यात.

बीड(प्रतिनिधी) दिनांक ७ जुलै मंगळवार रोजी दुपारी अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता मनीष ढाकरे याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. पडताळणीत कार्यकारी अभियंता मनीष ढाकरे यांनी ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

या सापळ्यात ढाकरे याला अंबाजोगाई येथील स्वतःच्या दालनात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात अलीकडील काळात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. एसीबीकडून सातत्याने कारवाया होत असतानाही काही शासकीय अधिकारी-कर्मचारी लाच मागण्याचे प्रकार सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 ही कारवाई बीड लाचलूचपत प्रतिबंध DYSP चिटटमपलले, अमोल खरसाडे, मछिंद्र बीडकर, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button