गुन्हेगारीला लगाम ! SP नवनीत कॉवत यांचा गुंडाना दणका.
दोन गुन्हेगार टोळ्या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार.

बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार, गुंडगिरी करणाऱ्यावर यापूर्वीही धडक कारवाया करुन काही टोळ्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती
बीड जिल्ह्यातील दोन कुख्यात गुन्हेगार टोळ्यांना दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चोरी, घरफोडी, दरोडे, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गुटखा तस्करी तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारुती खेडकर यांनी शेख जावेद शेख बशीर (वय 44) व शेख इकबाल शेख रशीद (वय 28) यांच्या टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे नोंद असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. चौकशी आणि सुनावणीनंतर या टोळीला बीड, जालना, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
तसेच बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डी. एस. कांबळे यांनी अभय रविंद्र जोगदंड (वय 21) व अर्जुन धनराज नागटिळक (वय 21) यांच्या टोळीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे असल्याने हद्दपार प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार या टोळीला बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत बीड यांच्या मार्गदर्शनाखाली अपोअ श्रीमती चेतना तिडके, श्री. शेख समीर उप विभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोअ श्री. ऋषीकेष शिंदे, श्री. वेकंटराम केज, पो.नि. श्री. शिवाजी बंटेवाड स्थागुशा, बीड पोनि श्री. मारुती खेडकर, श्री. निलेश केळे, सपोनि पुजारी पोअं/ सुभाष मोठे, नितीन राठोड, अलताफ शेख, सर्व पोस्टे पेठ बीड, सपोनि श्री. डी. एस कांबळे पोअं/ संजय राठोड, विष्णु फुके, शरद कदम, गोविंद फड, सर्व पो.स्टे बर्दापुर, स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोशि बिबिसेन चव्हाण, अलीम शेख यांनी केली आहे.
बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, टोळ्या व गुंडांविरोधात एमपीडीए (MPDA), मकोका (MCOCA) आणि हद्दपार यांसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.









