धक्कादायक ! दूधवाला पाजतोय भेसळुक्त दूध.
बंद पॅकेट मधील दूध कॅन्डमध्ये मिसळतानाचा व्हिडिओ व्हायरल.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सकाळी सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान काही दूध विक्रेते बंद पॅकेटमधील दूध फोडून ते कॅनमधील दुधात मिसळत असल्याचे दिसत आहेत. यामुळे नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत असून कॅन्सर सारखे भयानक रोग देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा प्रकार बीड शहराजवळील पांगर बावडी,आहेर वडगाव, मोची पिंपळगाव,कोल्हारवाडी परिसरातील काही दूधवाले असे प्रकार घडत आहेत. तर काही पॅकेटमध्ये दूध विक्री ते हे गावोगाव जाऊन दूध विक्रेत्याच्या घरी देखील बंद पाकीट मधील दूध विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील वस्तुस्थिती संबंधित यंत्रणांकडून तपासली जाणे आवश्यक आहे. मात्र, दुधामध्ये पॅकेजिंग दूध मिसळण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळले जात आहे.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीविरोधात कठोर भूमिका घेतली जात आहे.
राज्यात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळ करणाऱ्यांवर सातत्याने कारवाया सुरू आहेत. अशा परिस्थितीत बीडमधील या व्हायरल व्हिडिओचीही तातडीने दखल घेऊन संबंधित दूध विक्रेते आणि डेअरींची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बीड शहरातील नागरिकांनी देखील आपल्या दूधवाल्याकडे चौकशी करण्याची गरज आहे खरच आपल्याला चांगले दूध देतो की विसरू देतो हे विचारणा केली पाहिजे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधामध्ये केमिकल, दूध पावडर, डिटर्जंट, पामतेल किंवा इतर घातक पदार्थ मिसळले जात असल्याचे माध्यमा समोर सांगितले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, कोणावर कारवाई होते का, आणि तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









