ब्रेकिंग न्यूज

पत्रकाराची मुलगी रितिका ससाणे यांची महसूल सहाय्यक पदी नियुक्ती.

प्रतिकूल परिस्थितीतून घवघवीत यश.नातेवाईक मित्रपरिवारातुन शुभेच्छाचा वर्षाव.

बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या २०२४ च्या स्पर्धा परीक्षेत रितिका अनिल ससाणे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती मिळवली आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रितिका यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या आईने शेती करत त्यांना शिक्षण दिले, तर त्या स्वतः खासगी वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही कार्यरत होत्या. आई-वडिलांचे मार्गदर्शन व कुटुंबाचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याचे रितिका यांनी सांगितले.

रितिका ससाणे या सांय. दैनिक सिटीझनचे व्यवस्थापक तसेच ज्येष्ठ पत्रकार अनिल ससाणे यांची मोठी कन्या आहेत.

या यशाबद्दल त्यांचे आई-वडील, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button