ब्रेकिंग न्यूज

आकाश जोशीची MPSC मध्ये यशस्वी झेप!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत,महसूल सहाय्यक पदावर निवड.

नाशिक (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या २०२४ च्या स्पर्धा परीक्षेत आकाश रमेश जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महसूल सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आकाश यांनी हे यश मिळवले. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनिश्चितता, अपयशाचे धक्के आणि सततचा संघर्ष यांना सामोरे जात त्यांनी अखेर यशाचा टप्पा गाठला.

आकाश यांचे वडील रमेश जोशी हे वाडिया सार्वजनिक वाचनालयात सेवक म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने आकाश यांनी इयत्ता ११ वीपासूनच स्वखर्चाने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अर्धवेळ काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि उर्वरित वेळेत MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली.

त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या यशाने अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button