पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मानवतेची दर्शन.
अपघातातील जखमींना स्वतःरुग्णालयात केले दाखल केल्याने जखमींना मिळाले जीवनदान.

बीड(प्रतिनिधी)दिनांक 19 एप्रिल रोजी सोलापूर धुळे महामार्ग गेवराई शहारा नजीक मध्यरात्री सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. रात्रीची वेळ असल्याने जखमींना मदत करण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते.या वेळी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे येत असताना अपघात त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. एसपींच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अपघातात गणेश बाबूराव शेवाळे, त्यांची पत्नी शीतल शेवाळे आणि मुलगी प्रियदर्शिनी हे गंभीर जखमी झाले असून मुलगा साई किरकोळ जखमी झाला आहे. हे कुटुंब छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे कारने (एमएच-१२ एसक्यू २९८९) प्रवास करत होते. दरम्यान, बीडकडून जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच-२० ईजी ७६६६) विरुद्ध दिशेने येऊन कारला जोरदार धडक दिली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्यासह इतर पोलिस कर्मचारीही दाखल झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिस अधीक्षक पुढील प्रवासासाठी बीडकडे रवाना झाले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या तत्परतेमुळे अपघातातील जखमींचे प्राण वाचले असून मानवतेचे दर्शन झाले.





