ब्रेकिंग न्यूज

चाकूने वार करत मोबाईल लुटणारा पोलिसांच्या ताब्यात.

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटक;बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

बीड (प्रतिनिधी) – बीड शहरात चाकूचा धाक दाखवून रॉबरी करणाऱ्या फरार आरोपीला अटक करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरील वंदना हॉटेल परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादी उमेश सुनील पारिक (वय ३०, रा. काशी नगर, जालना रोड, बीड) यांच्यावर आरोपीने चाकूने हल्ला करत मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील ओप्पो A11 कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे २० हजार रुपये) लुटून घटनास्थळावरून पळ काढला होता. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले होते.

या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ००७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी माहितीकारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत आरोपीचा माग काढला. अखेर विनोद मुळे (रा. भाजी मंडई, बीड) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले असून, त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने ही मोहीम राबवली. भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाणे निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,पो.हे.जाधव त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

“गुन्हेगारीवर कडक कारवाई, नागरिकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता,” असा ठाम संदेश बीड शहर पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button