अंबाजोगाई आर टि ओ कार्यालयास दुसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटींचा निधी-आमदार सौ नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई


*अंबाजोगाई आर टि ओ कार्यालयासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटीचा निधी मंजूर- आमदार सौ नमिता मुंदडा यांच्या पाठपुरव्याला यश*
अंबाजोगाई – प्रतिनिधी :—
अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुसऱ्या टप्यासाठी राज्य शासनाकडून
१५ कोटींचा निधी मंजूर केला असून यामुळे कार्यालयाच्या पुढील विकास कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे. कार्यालयाचे या पूर्वीच बांधकाम पूर्ण झाले असून नवीन जागेत कार्यालय सुरू झाले आहे,यासाठी सततचा पाठपुरावा आमदार सौ नमिता मुंदडा यांनी केला असून त्यांच्या या पाठपुराव्यात मोठे यश मिळाले आहे.
भव्य आणि सुसज्ज कार्यालय झाले असले तरीही अजून इमारती मध्ये स्टील्ट फ्लोअर,फर्निचर,पाणी पुरवठा, सौर यंत्रणा,,मलनिस्सारण, विद्युतीकरण,संरक्षक भिंत,अंतर्गत सिमेंट रस्ते,वाहनतळ शेड,मुख्य प्रवेशासाठी पुलाचे काम,दिव्यंगासाठी रॅम्प,लिफ्टची सुविधा,रेनवॉटर हार्वेस्टिंग,सोलर रुफटॉप यंत्रणा इत्यादि सोई करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,मंत्री पंकजाताई मुंडे
यांचे आभार मानले आहेत.






