ब्रेकिंग न्यूज

स्वर्गातून ‘धर्मवीरां’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्राद्वारे साकडं.

त्या"दिव्यांग"शिवसैनिकाच्या डोळ्यांतील पाणी पुसून त्याला घर मिळवून दे !

कधी काळी ठाण्याचे वाघ म्हणून ओळखले जाणारे आणि आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयात जिवंत असणारे दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका ‘काल्पनिक’ पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. हे पत्र म्हणजे साक्षात आनंद दिघे साहेबांनी ‘स्वर्गातून’ त्यांचे लाडके शिष्य एकनाथ शिंदे यांना एका गरजू दिव्यांग शिवसैनिकाच्या घरासाठी लिहिलेला भावनिक संदेश असल्याचे मानले जात आहे. एकनाथ, सामान्य शिवसैनिक हाच माझा खरा परिवार आहे. आज हेच सैनिक घरासाठी वणवण फिरत आहेत, त्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे हीच माझी इच्छा आहे,” अशा आशयाचे अत्यंत भावूक आणि खळबळजनक पत्र स्व. धर्मवीर आनंद दिघे यांनी स्वर्गातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असुन धर्मवीर आनंद दिघे साहेब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दैवत आणि राजकीय गुरू आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा शिंदेंनी पुढे नेला आहे. अशातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिव्यांग शिवसैनिकाच्या धर्मवीर आनंद दिघे यांचे ‘स्वर्गातून’ लिहिलेले एक भावनिक काल्पनिक पत्र वाचून दाखवण्यात आले. या पत्रात सामान्य शिवसैनिकांच्या घरांचा प्रश्न आणि त्यांच्या मदतीचा कळकळीचा विषय मांडण्यात आला असून, सध्या या पत्राची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांचे ‘स्वर्गातून’ एकनाथ शिंदे यांना पत्र 

प्रति,लाडका शिष्य एकनाथ,

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

एकनाथ,

आनंद आहे तू आज राज्यांचा गाडा समर्थपणे हाकतोयस. पण आज वरून पाहताना माझं मन थोडं व्याकूळ झालंय. अवकाळी पावसाचा जोर वाढला आणि माझं लक्ष एका सामान्य शिवसैनिकाच्या घराकडे गेलं.

बाहेर पाऊस कोसळत होता, पण त्या गरिबाच्या घरात छतातून पाणी गळत असल्याने जणू ‘नदीचं पात्र’ तयार झालं होतं. अपंग असलेलं दोन्ही पायांनी पोरं-बाळं एका कोपऱ्यात कुडकुडत बसली होती. एकनाथ, आपण ‘आनंद दिघे’ किंवा ‘शिवसेना’ म्हणून जेव्हा उभे राहिलो, तेव्हा हाच सामान्य कार्यकर्ता आपली ताकद होता. पावसाळ्यात कोणाचं घर गळत असेल, तर त्याचं दुःख आपल्याला झोपू देता कामा नये.  तुला आदेश नाही, तर माझा आशीर्वाद युक्त आग्रह आहे की, अशा प्रत्येक सामान्य शिवसैनिकाचा शोध घे ज्याचं घर पावसाळ्यात गळतंय. त्यांना तात्काळ पक्कं घर बांधून देण्याची व्यवस्था कर. तुझ्या स्व खर्चातून घरं बांधून दे. त्याला ‘घरकुल’ नाही, तर ‘मायेचं छत्र’ हवंय.लक्षात ठेव, सत्ता येते आणि जाते, पण कार्यकर्त्याच्या डोळ्यातील समाधान हेच आपलं खरं वैभव आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी व संपायच्या आत त्यांच्या डोक्यावर हक्काचं आणि कोरडं छप्पर असेल, याची जबाबदारी तुझी!

“आपल्या पक्षाचा एक निष्ठावंत शिवसैनिक( दिव्यांग शिवसैनिकाचे नाव शुभम रंजित घोडके रा.सावता नगर गेवराई जिल्हा बीड]) याचे घर या पावसाळ्यात प्रचंड गळत आहे. पावसाचे पाणी थेट घरात येत असून घराची अवस्था एखाद्या नदीच्या पात्रासारखी झाली आहे. अशा परिस्थितीत तो आपला संसार कसा सांभाळणार?लक्षात ठेव, जो शिवसैनिक दिवस-रात्र पक्षासाठी राबतो, त्यांच्या डोक्यावर हक्काचे आणि सुरक्षित छप्पर असणे ही आपली जबाबदारी आहे. या पत्राची दखल घेऊन तू स्वतः तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी कर. त्या शिवसैनिकाचे घर गळणार नाही याची तातडीची सोय कर आणि त्याला लवकरात लवकर नवीन पक्के घर बांधून देण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था कर. यामध्ये कोणताही विलंब नको. साहेबांच्या शिवसैनिकाला त्रास होता कामा नये.”हे पत्र तुला लिहिण्याचं कारण म्हणजे आपल्या एका कट्टर शिवसैनिकाची अवस्था. स्वर्गातुन कालच मी त्याच्या घरी जाऊन आलो. पावसाळ्याचे दिवस येतील आता आहेत, बाहेर पाऊस कोसळतोय आणि आत त्या निष्ठावंत शिवसैनिकाचं छप्पर गळतंय. स्वतःच्या संसाराची काळजी न करता ज्यांने पक्षासाठी आणि भगव्यासाठी आयुष्य वेचलं, आज तो आणि त्याचं कुटुंब ओल्या भिंतींच्या आश्रयाने रात्र काढत आहेत.एक लक्षात ठेव, हे शिवसैनिकच आपली खरी ताकद आहेत. ज्यावेळी आपण संकटात असतो, तेव्हा हेच लोक ढाल बनून उभे राहतात. मग आज त्यांच्यावर संकट आल्यावर आपण मागे कसं हटायचं? त्याचं घर पावसापासून वाचलं पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर पक्क्या घराची सोय झाली पाहिजे.

तुला सांगतोय, कोणत्याही सरकारी कागदपत्रांच्या जंजाळात न अडकता, त्याला तात्काळ मदत पोहोचली पाहिजे. त्याला नवं घर बांधून देण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी आणि त्याच्या घराची ही गळती थांबलीच पाहिजे.हे काम युद्धपातळीवर कर. आनंद मठात येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटलं पाहिजे की, त्याचा ‘धर्मवीर’ आणि त्याचा ‘भाई’ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

जा, कामाला लाग! जय महाराष्ट्र 

तुझाच, आनंद दिघेसाहेब

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु, दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचं एक अत्यंत भावनिक पत्र सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. “स्वर्गातून दिघे साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून सामान्य शिवसैनिकांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले आहे,” असा मसुदा असलेली बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले तसेच या धर्तीवर किंवा दिघे साहेबांच्या विचारांवर आधारित एक अत्यंत भावनिक काल्पनिक पत्र असल्याचं समजते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button