ब्रेकिंग न्यूज

उपोषणाचा इशारा देताच महसूल विभागाला आली जाग !

ईमामपूर रोडवरील अवैध मुरूम उत्खननावर कारवाई;दोन हायवा जप्त,पोकलेन व इतर टिप्पर कुठे गेले?

बीड (प्रतिनिधी) बीड शहरा नजीक डोंगर भाग मुरूम माफी यांनी अक्षरशः पोखरूला आहे. याकडे महसूल विभाग डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे मामपूर रोडनजीक सुरू असून इमरान जागीरदार यांनी अवैध मुरूम उत्खनना विरोधात महसूल विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा उत्खनन बंद न केल्यास उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल विभागाला अचानक जाग आल्याचे चित्र दिसून आले.

लेखी तक्रारीवरून आज दिनाक 13 जून शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता महसूल पथकाने इमामपूर रोड परिसरात धडक कारवाई केली.

तो मुरूम कोणत्या डोंगर भागातून आणला किंवा कोणत्या शेतकऱ्याच्या डोंगर भागातून उत्खनन व वाहतूक केली त्याची परवाना होता का?रॉयल्टी भरली होती का?याची देखील सखोल तपासणी करण्याची गरज आहे जर विनापरवाना मुरूम उत्खनन व वाहतूक होत असेल तर त्या शेतकऱ्याच्या सातबारावर बोजा टाकण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे.

माहितीनुसार, इमामपूर,चराटा,धानोरा रोड, संबंधित भागात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मुरूम उत्खनन सुरू असून जवळपास 20 ते 25 टिप्पर आणि चार पोकलेन मशीनद्वारे दिवस-रात्र मुरूम उपसा होत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, महसूल पथकाला कारवाईदरम्यान केवळ दोन हायवा टिप्पर आणि एक मातीचा टिप्पर आढळून आला. उर्वरित टिप्पर आणि पोकलेन मशीन अचानक गायब झाल्याने महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ही कारवाई बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत जाधव, मंडळ अधिकारी तांदळे आणि मंडळ अधिकारी शितल साठे यांनी केली. जप्त करण्यात आलेले दोन टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले असून त्यांच्यावर चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.

मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचे बोलले जात असताना पोकलेन मशीन आणि इतर टिप्पर कारवाईतून कसे सुटले? तक्रार देऊन देखील या डोंगर भाग पोखरणारावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने महसून विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच अवैध, विनपारवाना मुरूम उत्खनन केल्याने लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे.आज केलेल्या कारवाईत केवळ दोन वाहनांवर कारवाई करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, इमामपूर रोडसह शहरातील इतर भागांतील अवैध मुरूम उत्खनन पूर्णपणे बंद करून डोंगर आणि निसर्गाचे सौंदर्य जपावे, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे. अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून शासनाच्या महसूलाचेदेखील मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button