ब्रेकिंग न्यूज

बेपत्ता महिलेचा मृतदेह तलावात आढळला.

दोन दिवसापासून शशिकला जाधव होत्या बेपत्ता; तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील धोंडीपुरा येथील दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या महिलेबाबत दुर्दैवी माहिती समोर आली आहे. सौ. शशिकला अशोक (बाप्पू) जाधव या थिंगळे गल्ली येथे वास्तव्यास होत्या. घरातून बाहेर पडल्यापासून त्यांचा कोणताही संपर्क होत नव्हता, त्यामुळे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक त्यांचा शोध घेत होते. परंतु जाधव ह्या मिळून न आल्याने कुटुंबीय नातेवाईक चिंतेत होते.

मात्र, आज दिनांक २० एप्रिल (सोमवार) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह घोडका राजुरी तलावात आढळून आला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

 शशिकला जाधव या अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या असल्याने या परिसरात त्यां सर्वतोपरिचित होत्या, परंतु त्या अचानक बेपत्ता झाल्या व तलावात मृतदेह आढळल्याने हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button