वार्ता समूहाच्या १८ व्या वर्धापन दिनी ए बी पी माझाचे मुख्य संपदक राजीवजी खांडेकर यांची उपस्थिती
७ मार्च रोजी वर्धापन सोहळा:अंबाजोगाई


*वार्ता समुहाच्या 18 व्या वर्धापन दिनी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर व नामांकित उद्योजक रावसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थिती*
अंबाजोगाई / प्रतिनिधी
गेल्या 18 वर्षापासुन बीड जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून नावारूपास आलेले आणि समाजातील वास्तव परिस्थितीची मांडणी करून लोकाभिमुख ठरलेल्या दैनिक वार्ता समुहाचा 18 वा वर्धापन दिन सोहळा येत्या शनिवार, दि.7 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने जगभरात नावलौकिक प्राप्त असलेल्या एबीपी माझा मराठीचे व एबीपी हिंदी न्युजचे मुख्य संपादक राजीव खांडेकर व भारतातील प्रसिद्ध उद्योजक रावसाहेब घुगे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणार्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये नगर भूषण पुरस्कार हा जळगाव येथील अप्पर पोलिस अधिक्षक अशोकराव नखाते, सदभावना पुरस्कार प्रगतशील शेतकरी व उद्योजक गौतमचंद सोळंकी यांना तर युवा गौरव पुरस्कार हा पुणे येथील युवा उद्योजक सुशिल शंकरराव गाडवे यांना जाहिर करण्यात आला. त्यासोबतच अंबाजेागाई येथील उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे व मुंबई येथील उपजिल्हाधिकारी गणेशराव पवार यांना त्यांच्या उत्कृष्ट महसुली सेवेबद्दल सन्मानित केले जाणार आहे. त्पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 7 मार्च 2026 रोजी अंबाजोगाई येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद येथे सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे उपमुख्यअभियंता इंजि.नवनाथ घाडगे पाटील, परभणी येथील कार्यकारी अभियंता इंजि.प्रसाद लांब, परळी वै.च्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, धारूरचे नगराध्यक्ष बालासाहेब जाधव, केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, अध्यक्ष हारूणभाई इनामदार, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, केज येथील गंगामाऊली शुगरचे व्हा.चेअरमन हनुमंत मोरे, अ.भा.फिजीशिएशन असो.अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष राहुल धाकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिक-बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वार्ता समुहाचे संपादक परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, अ.भा.मराठी पत्रकार परिषद, अंबाजोगाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अंबाजोगाई, अ.भा.मराठी डिजीटल पत्रकार संघ, अंबाजोगाई, गुडमॉर्निंग ग्रुप, अंबाजोगाई , व्हाईस ऑफ मिडीया शाखा अंबाजोगाई यांनी केले आहे.




