नगरसेवक सुरज चुंगडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळण्याची शक्यता.
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर उच्च न्यायालयात धाव;सबळ पुरावे सादर.

बीड (प्रतिनिधी)बीड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक सुरज जयसिंग चुंगडे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरज चुंगडे यांनी आपल्या बाजूने शालेय नोंदीतील जातीचा उल्लेख तसेच इतर आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर केले असल्याचे समजते. या सबळ पुराव्यांच्या आधारे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा निर्णय समोर आल्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात, विशेषतः शिवसेना गटात, मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आपल्याकडे कायदेशीरदृष्ट्या सक्षम पुरावे असल्याने न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय मिळेल, असा विश्वास नगरसेवक सुरज चुंगडे यांनी व्यक्त केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याची वार्ता समजताच विरोधकानी आनंद व्यक्त केल्याची माहिती मिळाली असून जात प्रमाणपत्र अवैध म्हणजे नगरसेवक पद रद्द असे नसून केवळ पुरावा सादर करण्यास विलंब झाल्याने जात प्रमाणपत्र अवैध करण्यात आले असे समजतात विरोधकाचा हिरमोड झाला.
नगरसेवक सुरज चुंगडे यांनी जात प्रमाणपत्राचे उच्च न्यायालयात पुरावे सादर केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.









