मांजरसुंबाजवळ भीषण अपघातात मराठा सेवकाचा मृत्यू.
उपोषणस्थळ अंतरवालीहुन परतताना अपघात,एकाच मृत्यू दोन गंभीर जखमी.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात होऊन इंदापूर येथील एका मराठा सेवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन रात्री परतीच्या प्रवासात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
मराठा संघर्ष योद्धा यांनी मराठा समाजाचे विविध मागण्यासाठी अंतराळीसाठी येथे 31 मे रोजी तळत्या उन्हात उपोषणास बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून मराठा सेवक उपोषण स्थळी दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 31 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 2:20 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 (धुळे–सोलापूर मार्ग) वरील कन्हैया हॉटेलजवळ हा अपघात झाला. कार क्रमांक MH 42 BE 2827 ही भरधाव वेगात येत असताना रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH 32 Q 9300 ला पाठीमागून जोरदार धडकली. या अपघाताची माहिती पोलीस अधिकारी ढगारे यांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.धडकेनंतर कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
या अपघातात इंदापूर तालुक्यातील मराठा सेवक रामचंद्र (रामभाऊ) शंकर जमदाडे (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. तर संतोष पांडुरंग माने आणि बिपिन नारायण मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयातील ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
हे तिघेही मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून आले होते. उपोषणस्थळावरून परतताना काळाने घाला घातल्याने मराठा बांधवांत शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
अचानक झालेल्या या अपघातामुळे इंदापूर तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये शोक व्यक्त होत असून जमदाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











