ब्रेकिंग न्यूज

बीड : तेलगाव नाका चौकात तरुणाचा मृतदेह आढळला

मृतदेह आढळल्याने खळबळ.पेठ बीड पोलिसांनी दाखवली माणुसकी..

बीड, प्रतिनिधी :दिनांक 20 जून बीड शहरातील बार्शी नाका परिसरात शनिवारी एका इसमाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शेख नयूम शेख लाल (वय 35, रा. पापनेश्वर मंदिर परिसर, बीड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख नयूम हे बार्शी नाका येथे मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे अंमलदार अल्ताफ शेख आणि शिवाजी राख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय, बीड येथे पाठविला.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत स्पष्टता येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button