ब्रेकिंग न्यूज

विशाल डेअरीवर कारवाई;डेरीचा परवाना निलंबित.

६.६८ लाखांचा साठा जप्त; बीडचे अन्न औषध प्रशासन अधिकारी ॲक्शन मोडवर.

बीड(प्रतिनिधी)अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली. बीड जिल्ह्यातील भेसळखोरात खळबळ उडाली. राज्यात भेसळखोरा विरोधात कारवाईच्या मोहीम सुरू असल्याने भेसळखोराचे धाबे दणाणले आहेत.नागरिकांच्या जीवांशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 बीड जिल्ह्यात देखील तपासणी मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत १७ जून रोजी केज तालुक्यातील उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली.

तपासणीदरम्यान डेअरीमध्ये अत्यंत अस्वच्छ व आरोग्यास घातक वातावरणात हलवा आणि कलाकंदाचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. उत्पादनासाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य तसेच तयार अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये लिक्विड ग्लुकोज, खुला खवा, वनस्पती तूप, विविध प्रकारचा हलवा आणि पारंपरिक मिठाईंचा समावेश आहे.

अन्न नमुने १८ जून रोजी प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा संशय आणि आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे तब्बल ६ लाख ६८ हजार ४०९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून डेअरीचा परवानाही पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

ही कारवाई सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भेसळयुक्त माल, गुटखा आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू असून सर्वसामान्य ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सदर कारवाई हि श्री. एस. आर. करकाळे, मा. सह आयुक्त अन् छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.वि.वि. पाटील, सहायक आयुक्त् अन्नछत्रपती संभाजीनगर, व श्री.द.वि. पाटील, सहायक आयुक्त् अन् छत्रपती संभाजीनगर, श्री. कुचेकर, अन् सुरक्षा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांचे समवेत श्री.अ.दि.नरवाडे, श्री.अ.भ.गाढे. श्री.सि.सु.खंदारे अन् सुरक्षा अधिकारी बीड यांच्या पथकाने केली.

बीड शहर व जिल्ह्यातील स्वीट होम, दूध डेअरी,लस्सी, आइसक्रिम,हॉटेल्स, चायनीज गाडे, फरसाण दुकाने, पेढा-सोनपापडी उत्पादक, चिक्की उत्पादक तसेच पावभाजी सेंटर, रसायन ठेवून पिकवलेले आंबे, धाबे व फळ याची तपासणी करण्यात यावी व दूषीवर कठोर कारवाई करून मकोका लावावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button