
बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथील दहावीमध्ये शिक्षण घेत असलेले दोन विद्यार्थी बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. रितेश जालिंदर आगलावे (वय 16) आणि विनायक भागवत आगलावे (वय 16) हे चुलत भाऊ सकाळी सुमारे 9 वाजता शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नाही यामुळे कुटुंबात व नातेवाईकात चिंतेचे वातावरण पसरले असून बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना बीडकडे जाणाऱ्या बसमध्ये काही नागरिकांनी पाहिले होते. ते बीड बस स्थानकात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र, त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे हिवरापहाडी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणाला ही मुले दिसल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
7498355876,9168792193
फिरोज : 9710797777, 9803157575
बीड शहरातील सीसीटीव्ही तपासणी पोलिसांकडूनही शोधमोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी माहिती मिळाल्यास तातडीने संबंधितांना किंवा पोलिसांना कळवावे.











