ब्रेकिंग न्यूज

घरफोड्या करणारा सराईत आरोपीला बेडया.

1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त;दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)अंबाजोगाई शहरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने सराईत आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रभाकर रघुनाथ मुंडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही घटना 13 मे ते 18 मे 2026 दरम्यान घडली होती. याप्रकरणी 19 मे रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा क्रमांक 182/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना 27 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे (रा. सैनिक कॉलनी, मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) याने दोन साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती मिळाली. आरोपी यशवंतराव चव्हाण चौकाजवळ मोरेवाडी रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली. यावेळी चोरीतील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.

ही कामगिरी मा.प्र. पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मँडम, सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेष शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि शिवाजी बंटेवाड, पोस्टे अंबाजोगाई शहरचे प्रभारी शरद जोगदंड, पोउपनि सुशांत सुतळे, पोह/मारूती कांबळे, पोह/रामचंद्र केकान, पोह/विष्णु सानप, पोह/गोविंद भताने, पोह/युनूस बागवान, पोह/गोविंद राख, पोअ/सचिन आंधळे, विकी सुरवसे, व पोह/पाडुरंग काळे पोस्टे अंबाजोगाई शहर मिळुन केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button